Sunday, September 26, 2021

केंद्रीय मंत्री दानवेंची महसूलमंत्री थोरातांवर मिस्कील टीका म्हणाले शरद पवार..

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारविरोधात लढण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं, असे विधान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यानंतर थोरात यांच्या या विधानावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मिस्कील टीका करत खिल्ली उडवली.

पवार यांनी काँग्रेसवर केलेली टीका अगदी बरोबर आहे. कारण ते त्या घरात राहिले आहेत. त्या घराचे कोणते खांब ढासाळले, याची त्यांना चांगली माहिती आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पडक्या हवेलीत ते कधीही जाणार नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पवारांच्या टिकेचे समर्थन केले.

या सरकारमधील तिन्ही पक्ष आपला एक उद्देश साध्यकरण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे शरद पवार सरकारला बाहेरून टेकू देत आहेत. त्यामुळे पवार किती टोकदार बोलले, तर सरकार पडणार नाही. या तिन्ही पक्षांचा उद्देश पूर्ण झाला की हे तिन्ही पक्ष एकमेकांचे पाय ओढतील. त्यांचा उद्देश साध्य झाला की ते सरकार असे‌ पडेल की त्यांनाच कळणार नाही.

पवारांची टीका ही सत्य आहे, असेही दानवे म्हणाले.
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. याबाबत ते म्हणाले, राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. या सरकारने वकिलांची फौज न्यायालयात उभी करायला पाहिजे होती.

केंद्र सरकारने राज्यांना ओबीसी आरक्षणाबाबतचा अधिकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता त्याबाबतची पावलं उचलण्याची गरज आहे. पण ते या सगळ्याचे खापर केंद्रावर फोडत राहिले. आता हा धंदा त्यांनी बंद करायला हवा. केवळ मोर्चे काढून आणि स्वत:ला ओबीसी नेता असल्याचे मिरवत आरक्षण मिळणार नाही.

ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने पुरावे सादर‌ करावेत. केवळ समाजासमोर चमकू नये, असा सल्ला दानवे यांनी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिला. भाजप ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार देणार, असे दानवे यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विषयी बोलताना दानवे म्हणाले, अनिल देशमुख कुठे गायब आहेत. कुठे आहेत ते राज्याचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. रेल्वेमध्ये जेवण आणि चादरी देणे बंद आहे, या विषयी विचारले असता दानवे म्हणाले, कोरोना काळात चादरी जेवण बंद केले. राज्य सरकाने परवानगी दिली तर सुरु करु,

असेही त्यांनी सांगितले. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. कोरोना काळ सोडला तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी चांगलं वातावरण होतं, असंही त्यांनी सांगितलं.

💁‍♂️ नगर जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील तुमची बातमी झटपट मिळवण्यासाठी फेसबुक पेजला लाईक करा

https://www.facebook.com/newsmymaharashtranews/

💁‍♂️ टेलिग्राम च्या ग्रुप वर जॉईन होण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://t.me/joinchat/Sroc5al3MuYsrW8f

💁‍♂️ माय महाराष्ट्रला डेलीहंटवर फॉलो करायला विसरू नका*

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!