माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर प्रत्येक जोडपं बाहेर कुठेतरी फिरायला जातात, ज्याला आपण हनिमून देखील म्हणतो. याकाळात नववधू आणि नवरदेवाला
एकमेकांना ओळखण्याचा आणि प्रेम व्हायला वेळ मिळतो. यासाठी लोक आपल्याला जमेल आणि खिशाला परवडेल अशा ठिकाणी जातात. तर काही लोक आपल्या आवडीच्या ठिकाणी जातात.
हे सगळं लग्नानंतरच होतं, पण तुम्ही कधी कोणाला लग्नाआधी हनिमूनला गेल्याचे ऐकले आहे?इतकंच नाही तर हनिमूनला गेलेल्या वराने आपल्या नववधूसोबत असा धिंगाणा केला की आता नववधू लग्न करु
की नको? अशा विचारात पडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चिनी जोडपे लग्नापूर्वी हनीमूनला जपानला गेले होते. त्याचवेळी दोघेही खरेदीसाठी गेले होते, मात्र मध्येच तरुण आपल्या भावी पत्नीला
बाजारात सोडून पळून गेला. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. ज्यावर काही लोकांनी मुलाच्या अशा वागण्यामुळे त्याला सोडून जाण्याचा सल्ला मुलीला
देत आहे. या प्रकरणाची माहिती स्वत: पीडित मुलीने दिली आहे.तरुणीने सांगितले की, ती चिनी तरुणासोबत जपानच्या सहलीला गेली होती. त्यावेळी ती खरेदी करत असतानाच त्यांचं भांडण झालंस यानंतर
तो तरुण या तरुणीला अशा दुसऱ्या देशाता एकटीला सोडून निघून गेला.या घटनेवर ती मुलगी म्हणाली, ‘मला तिथली भाषा येत नसल्याने मी कुठेही जायचे धाडस करू शकलो नाही, म्हणून मी त्याची वाट बघत बसले.
संध्याकाळी बर्फ पडत होता, मी दुकानाच्या छताखाली उभी राहिले आणि अंधार पडेपर्यंत त्याची वाट पाहत होतो, पण तो आलाच नाही.”सुदैवाने तिथे एक मुलगी आली, ती तैवानची होती, तिने हॉटेलसाठी तरुणीला टॅक्सी
बुक करुन दिली, जिथे पीडितेने वाय-फायच्या मदतीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी संपर्क साधला. मुलीने सांगितले की, या सगळ्या प्रकरणानंतर तिच्या होणाऱ्या बायकोने त्या दिवशी अनेक वेळा माफी मागितली.
पण दुसऱ्याच दिवशी तो असं वागू लागला की जणू काही झालेच नाही. ज्यामुळे तरुणीला आता अशा व्यक्तीसोबत राहण्याची भिती वाटू लागली आहे.ही पोस्ट आता चीनमध्ये वेगाने व्हायरल झाली