Sunday, September 26, 2021

कोरोना महामारी कधी संपणार? WHO च्या या उत्तरानं वाढवली चिंता

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतासह जगभरातील बहुतेक देशांमध्ये मागील दीड वर्षापासून कोरोनानं हाहाकार घातला आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली असली तरीही धोका टळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेपासून आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच वेळोवेळी याबाबतची नवनवी माहिती उघड करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतीच दिलेली माहिती मात्र चिंता वाढवणारी आहे. WHO नं म्हटलं की कोरोनाला अजून महामारीच्या श्रेणीतच ठेवलं जाईल, कारण हा विषाणू लगेचच जाणार नाही. संघटनेच्या या विधानातून हे स्पष्ट होतं की जगाला अजूनही प्रसार रोखण्यासाठी निर्बंध पाळणं गरजेचं आहे. कारण कोरोनाचे नवे व्हेरिएंट काळजी वाढवत आहेत.

आरोग्य संघटनेनं म्हटलं, की जेव्हा जगभरातील अधिकाधिक लोकांना लस दिली जाईल तेव्हा लोकांची इन्युनिटी वाढेल आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आपोआप कमी होईल. या स्थितीत पोहोचल्यानंतर कोरोनाला महामारीच्या श्रेणीतून हटवलं जाईल. सोबतच कोरोनाची लागण होणाऱ्या लोकांच्या संख्येतही घट होईल. मात्र, आरोग्य संघटनेनं हेदेखील स्पष्ट केलं, की सध्या अशी स्थिती आलेली नाही.

भारतात कोरोनापासून बचावासाठी अतिशय वेगानं लसीकरण मोहिम सुरू आहे. देशात 75 कोटीहून अधिकांनी लसीचा डोस दिला गेला आहे. सोबतच आता देशात लहान मुलांच्या लसीकरणाची तयारीही सुरू आहे. या महिन्याच्या शेवटीपर्यंत लहान मुलांची लसही उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!