Sunday, September 26, 2021

तोपर्यंत कोरोना संकट कायमच, WHO च्या उत्तराने चिंता वाढवली

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या दीड वर्षांपासून जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना माहामारी कधी संपणार हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. कोरोना मुळे होणारे मृत्यू लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता जगाला वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं आहे. त्यातच आता जागितक आरोग्य संघटनेनं एक नवीन माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यावरुन जग लवकर या संकटातून मुक्त होणार नसल्याचे दिसते आहे.जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना माहामारी अजून संपली नसून, कोरोना विषाणु संसर्गाला पुढचे काही दिवस माहामारीच्या श्रेणीमध्येच ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी येणाऱ्या काळात अनेक दिवस कोरोना प्रतिबंधक नियमांची काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातचं कोरोनाचे नवीन व्हेरियंट चिंता वाढवणारे ठरता आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं यावेळी कोरोनाच्या या लढाईत लसीकरण अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.

लसीकरणामुळेच कोरोना महामारीचा प्रभाव कमी होऊन मृत्यूची संख्या कमी होईल असे यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.दरम्यान, आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे आढळल्याने खळबळ माजली आहे.चीनच्या उत्तर पुर्व भागातील असणाऱ्या फुजियान प्रांतामध्ये

असणाऱ्या झियामेन शहरात कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे काही रुग्ण आढळले आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळ्यानंतर शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या या शहरात पर्यटनासाठी असलेल्या हॉटेल, बार, सिनेमागृह,

जीम आणि वाचनालयं बंद करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले असून, यामुळे जगाची चिंता वाढणार आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!