Sunday, September 26, 2021

नगर ब्रेकींग:छिंदम बंधूंना अटक

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही कारवाई झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर 30 ते 40 जणांवर भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. छिंदम बंधूंसह चार जणांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी

अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर न्या. सुरेंद्र पी. तावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने फेटाळल्यानंतर बुधवारी सकाळी श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना अटक करण्यात आली आहे.

महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांना प्रत्येकी 15 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत दररोज पोलिस ठाण्यात हजेरीचे आदेश आहेत.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!