Sunday, September 26, 2021

सावधान! तुम्हीही Car ला लिंबू- मिरची, काळी बाहुली बांधताय का? आजच थांबवा नाहीतर….

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वाहनांच्या वाढत्या दुर्घटना, प्रवासादरम्यान घडणारे अनुचित प्रकार या साऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी अनेकदा लोकं वाहनांवर काळा धागा वगैरे बांधतात. पण, काही लोक मात्र गाडीची नंबर प्लेटच या धाग्यांच्या जीवावर टांगून ठेवतात.

वाहतूक नियमांचं उल्लंघन करतेवेळी गाडीचा क्रमांक कोणाच्याही नजरेस पडू नये, यासाठी केलेली ही खुरापत. पण, असं करणाऱ्यांना आता चांगलाच धडा शिकवला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक अनोखा उपक्रम सुरु केला. ज्याअंतर्गत जाणूनबुजून वाहनांची नंबर प्लेट लिंबू – मिरची, काळा धागा, बाहुलीनं लपवल्यास अशा व्यक्तींकडून चलान कापण्यात येणार आहे.

फक्त रस्त्यांवरच नव्हे, तर कॅमेऱ्यांमध्ये कैद वाहनांच्या फोटोंच्या माध्यमातूनही हे चलान कापण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत वाहनांच्या फोटोंच्या सहाय्यानं वाहन मालकाचा पत्ता शोधत थेट पोलिसच त्यांच्या दारी धडकणार आहेत.
विशेष पोलीस आयुक्तांनी (वाहतूक) दिलेल्या माहितीनुसार नंबर ट्रेस करण्यासाठी अल्गोरिदम पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.

त्यामुळं घरी बसलेल्यांनाही दोषी आढळल्यास कारवाईचा सामना करावा लागणार आहे. डिफेक्टीव्ह नंबर सोबतच कोणत्याही वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्यासही त्यांच्याकडून चलान कापण्यात येईल. शिवाय त्यांच्या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणीही करण्यात येणार आहे.
माहितीसाठी, मोटर वेहिकल अॅक्टमध्ये नंबर प्लेटमध्ये काही त्रुटी आढळल्यास

त्यासाठी 5 हजार रुपये दंड आकारल्या जाण्याची तरतूद आहे. तर, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्यास 5 हजार रुपयांचं चलान कापलं जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं तुम्हीही असं काही करत असल्यास सावधान.ही कारवाई दिल्ली पोलिसांनी केली आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!