Sunday, September 26, 2021

आमदार निलेश लंकेच्या पुढच्या विधानसभेचा गुलाल एक लाखांचा : रुपाली चाकणकर

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: करोनाचे संकट असूनही आमदार नीलेश लंके हे मतदारसंघात कोट्यावधी रूपयांची विकास कामे करीत आहेत. सामान्य जनतेच्या पाठींब्यामुळे ते विधानसभेची निवडणूक ६० हजार मतांनी जिंकले. त्यांच्या विकास कामांचा सपाटा पाहिला तर पुढील निवडणूकीत त्यांचा गुलाल एक लाखांचा असेल

असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.निघोज येथील एक कोटी रूपये खर्चाच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासीका तसेच इतर विविध विकास कामांचे चाकणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. च्या अध्यक्षा राजश्री घुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

आमदार लंके, जि. प. च्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, माजी आमदार पोपटराव गावडे, ‘कन्हैय्या’ चे अध्यक्ष शांताराम लंके, जि. प. सदस्य पांडूरंग पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, सरपंच चित्रा सचिन वराळ, अशोक सावंत, प्रभाकर कवाद, ठकाराम लंके, सोमनाथ वरखडे, वसंत कवाद, बाबाजी लंके, बाळासाहेब लंके आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार लंके यांनी करोना काळात केलेल्या कामाची स्तुती करतानाच चाकणकर यांनी सामान्य जनतेचा प्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार लंके हे असल्याचे नमूद केले. आमदार लंकेे यांना जनतेने वर्गणी करून गेल्या विधानसभा निवडणूकीत साठ हजार मतांनी विजयी केले. मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करीत ते जनतेची सेवा करीत आहेत.

करोना संकटातही कोट्यावधी रूपयांची विकास कामे मार्गी लावत आहेत. त्यांचे हे काम असेच पुढे सुरू राहणार असून पुढील विधानसभा निवडणूकीत त्यांचा गुलाल एक लाखांचा असेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.चाकणकर पुढे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सामान्य जनतेचा पक्ष आहे. वैचारीक वारसा चालवणारा, सामान्य माणसाला आपलासा वाटणारा हा पक्ष आहे.

अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवित असताना आमच्या पक्षाला मिळणारे यश विरोधकांना पहावत नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कधी पडेल याची दररोज वाट पाहणाऱ्या विरोधकांचा आता हिरमोड झाला आहे. त्यांचे घर चालवण्यासाठी आम्ही मदत करतोच आहोत. मात्र स्वतःला मुल होत

नसल्याने दुसऱ्याचे बाळ पाळण्यात टाकणाऱ्यांसारखी विरोधकांची अवस्था झाल्याची बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी विविध तालुकास्तरीय समित्यांवर निवड झाल्याबद्दल सुदाम पवार, सोमनाथ वरखडे, बाळासाहेब लंके यांचा चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शांताराम कळसकर यांनी प्रास्ताविक तर सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!