Sunday, September 26, 2021

लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी समाजासाठी आपल्या आयुष्याचे दान दिले-शिवाजी महाराज देशमुख

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जिल्हा सहकारी बँक, साखर कारखाना व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घुले पाटलांनी अनेक गोर-गरिबांचे संसार उभे केले.सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या कार्याची आठवण आजही सर्वांच्या अंतःकरणात टिकून आहे.समाजात अनेक वस्तूंचे दान दिले जातात परंतु समाजासाठी आयुष्याचे दान देणे हा सर्वात मोठा विषय आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या हितासाठी आयुष्य वाचणारे लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी समाजासाठी आपल्या आयुष्याचे दान दिले असे प्रतिपादन नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना 91 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

.प्रारंभी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,शेवगाव पंचायत समितीचे सभापती व कारखान्याचे तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील,

श्रीसंत ज्ञानेश्वर संस्थांनचे शिवाजी महाराज देशमुख,श्रीसंत नागेबाबा देवस्थानाचे अंकुश महाराज कादे,दिलीपराव लांडे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे आदींनी स्व.घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख कुटूंबियांचे वतीने उदयन गडाख यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

श्रीसंत तुकाराम महाराज संस्थांनचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक म्हणाले,संत ज्ञानेश्वर माऊली हे अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च संत होऊन गेले.हे विश्वची माझे घर अशी व्यापकता त्यांनी हृदयात बाळगली,तो विचार समाजाला दिला,सर्व जाती धर्म-पंथ माऊलींनी आपलं म्हंटल म्हणून सर्व जगाने ने ही त्यांना आपले मानले.

राजकारणात काम करताना माऊलींचा तोच विचार लोकनेते घुले पाटलांनी तंतोतंत वापरला.गोर-गरीब,सर्व जाती धर्मांतील लोकांची कामे केली.विचारांचा मोठापणा असलेले व्यक्तिमत्त्व लाभलेला परिसर समृद्ध होत असतो.घुले पाटलांच्या कार्यकुशलता व दूरदृष्टीमुळे नेवासा-शेवगाव तालुक्यासह ज्ञानेश्वर कारखान्याचा परिसर समृद्ध झालेला आहे.त्यांच्या समृद्ध विचारांचा वारसा घुले बंधू समर्थपणे पुढे नेण्याचे काम करीत आहेत.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,राष्ट्रवादीचे नेवासा तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले,कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ,अमोल अभंग,मुळा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे,नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे,नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे,भयासाहेब देशमुख, दत्तात्रय खाटीक,शिवेसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ शेळके,रामदास गोल्हार,महंमद आत्तार,शब्बीरभाई शेख,रामभाऊ जगताप,अड.बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब नवले,उत्तमराव वाबळे,बापूसाहेब नजन,ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे,बबनराव भुसारी,मच्छीन्द्र म्हस्के,शिवाजी कोलते,

अशोकराव मिसाळ,कामगार संचालक सुखदेव फुलारी,संभाजी माळवदे,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,तुकाराम मिसाळ,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,अशोक वायकर,पंडितराव भोसले,शेवगाव बाजार समितीचे सभापती अनिल मडके,अंबादास कळमकर,

गोरक्षनाथ कापसे,रामभाऊ पाउलबुद्धे,भानुदास कावरे,तुकाराम काळे मामा,देविदास साळुंके,रवींद्र नवले,डॉ.सुधीर नवले आदिंनी टप्प्याटप्प्याने येईन स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी लोकनेते मारुतराव घुले पाटील यांची जयंती कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.जयंती निमित्त समाजातील शोषित व उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना

लोकनेते मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार दिला जातो.मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे यावेळी मोठा कार्यक्रम होऊ शकला नाही.कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सची मर्यादा पाळून  स्वरूपाचा स्मृती स्थळावर अभिवादन,प्रतिमा पूजन व भजनाचा कार्यक्रम झाला.

स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आलेल्यांचे थर्मल स्कॅनिंग करून सॅनिटायझर व मास्क देण्यात आले होते.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावी लागणारी सर्व ती खबरदारी यावेळी घेण्यात आली होती.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!