Sunday, September 26, 2021

SBI ग्राहकांना मोठा दिलासा

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशातली सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर आज, 15 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. स्टेट बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

कर्जाचे व्याजदरही कमी झाल्याने गृह कर्ज, वाहन कर्ज , वैयक्तिक कर्जासह अनेक प्रकारच्या कर्जांचा मासिक हप्ता कमी होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.स्टेट बँकेने बेस रेटमध्ये एक बेसिस पॉइंट म्हणजेच 0.05 टक्के कपात केली आहे. त्यामुळे या कपातीनंतर नवीन व्याजदर 7.45 टक्के झाला आहे.

याशिवाय बँकेने प्राइम लेंडिंग रेटमध्ये (PLR) 0.05 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएलआर 12.20 टक्के झाला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये स्टेट बँकेने गृहकर्जाचा दर 6.70 टक्के केला होता. यासोबतच महिला ग्राहकांना 0.05 टक्के अतिरिक्त सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गृहकर्जदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यामुळे मासिक कर्जाच्या हप्त्यात काहीशी घट होणार आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या अनेक ग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.त्याचप्रमाणे आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने अनेक जण घर घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं विचार करू लागले आहेत. त्यामुळे नवीन गृह कर्जदारांनाही घटत्या व्याजदराचा लाभ घेता येणार आहे.

याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्रालाही होणार आहे. कोरोना संकटाचा फटका बसलेल्या या क्षेत्राला यामुळे चालना मिळेल.अर्थात ठेवींचे व्याजदरही यामुळे कमी होणार आहेत. त्यामुळे नवीन ठेवीदारांना ठेवींवर कमी व्याजदराने व्याजाचा लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेने निश्चित केलेला व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) निश्चित केलेल्या बेस रेटवर आधारित आहे.

बेस रेट हा किमान व्याज दर असतो. याच्यापेक्षा कमी व्याजदराने कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेला सध्याचा आधार दर अर्थात बेस रेट 7.30 ते 8.80 टक्के आहे. जुलै 2010 नंतर घेतलेली सर्व गृहकर्जं आधार दराशी जोडलेली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेला सध्याचा एमसीएलआदर 6.55-7.00 टक्के आहे. यावरूनच व्याजाचे दर निश्चित केले जातात.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!