Sunday, September 26, 2021

आरे वा : आता कोरोना लशीचा फक्त एकच डोस घ्यावा लागणार

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात सध्या कोरोना लशीचे दोन डोस दिले जात आहेत. पण आता लवकरच फक्त एकच डोस घ्यावा लागणार आहे. सिंगल डोस  कोरोना लस स्पुतनिक लाइटला   मोदी सरकारने हिरवा कंदील दिला आहे. भारतात या या लशीचं ट्रायल होणार आहे. या लशीचा एकच डोस पुरेसा आहे.

भारतात सध्या रशियाच्या स्तुपनिक V कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरला मंजुरी देण्यात आलेली आहे. स्पुतनिक लाइट ही स्पुतनिक V चं पुढील व्हर्जन आहे, अशी माहिती याआधी रशियाने दिली होती. भारतात रशियन लस देण्यासाठी हैदराबादमधील डॉ. रेड्डी कंपनीने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडसोबत करार केलेला आहे.

स्तुपनिक V नंतर स्पुतनिक लाइटलाही भारतात मंजुरी मिळवण्यासाठी या कंपनीने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी  या लशीच्या ट्रायलला मंजुरी देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने या लशीच्या ट्रायलला मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता या लशीचं भारतात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल होणार आहे.

जुलैमध्ये या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागण्यात आली होती. पण केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन,  तज्ज्ञ समितीने ही मागणी नाकारली होती. भारतात या लशीचं ट्रायल झालं नाही, त्यामुळे याला परवानगी नाही देऊ शकत असं समितीने सांगितलं होतं. आता या लशीच्या ट्रायलला परवानगी मिळाली आहे.

मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे.  रॉयटर्सच्या वृत्तानुसार RDIF सांगितलं, सिंगल डोस स्पुतनिक लाइटचं 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान लसीकरण मोहिमेत ही लस वापरण्यात आली. लस दिल्यानंतर 28 दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस 79.4%  प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

  रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आलं आहे. यात  7,000 लोकांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!