Sunday, September 26, 2021

नरेंद्र मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिकॉम सेक्टरसाठी मदत पॅकेज मंजूर करण्यात आली आहे. बैठकीत एकूण 26058 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. वाहन आणि ऑटो कंपोनेंट

सेक्टरसाठी पीएलआय योजनेला देखील मंजुरी देण्यात आली आहे. ड्रोनसाठी पीएलआय योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टेलिकॉम कंपन्यांसाठी पॅकेज मंजूर करण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे.इलेक्ट्रिक वाहनं आणि हायड्रोजन फ्युअल वर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं उत्पादनाशी निगडीत

लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ही योजना 26 हजार कोटींची आहे. या योजनेमध्ये वाहतूक क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं विकसित करण्यात आलं आहे. सीएनजी, पेट्रोल, डिझेलवरील वाहन बनवणाऱ्या कंपन्यांना यामध्ये प्रोत्साहन मिळणार नाही. नवीन पीएलआय योजना 2023 च्या आर्थिक वर्षापासून सुरु होईल.

ही योजना तेव्हापासून पुढील पाच वर्षांसाठी सुरु राहील. त्यासाठी 2019-20 हे बेस वर्ष असेल. वाहन उद्योगातील स्पेअर्सपार्टसाठी देखील पीएलआय स्कीम चीघोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 22 पार्टचा समावेश करण्यात आला आहे.केंद्राकडून पॅकेज मंजूर झाल्याचं कळताच टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.

सर्वाधिक शेअर्स भारती एअरटेलचे वाढले आहेत. काही वेळापूर्वी भारती एअरटेलचा शेअर 732.80 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर गेल्या पाच दिवसात एअरटेलचा शेअर्स 45 रुपयांनी वाढला आहे. केंद्राच्या पॅकेजचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन आयडिया कंपनीला झाल्याचं दिसून आलं आहे. दुपारी एक पर्यंत व्होडाफोनचा शेअर 9 रुपये 30 पैशांनी वधारला.

तर, गेल्या एक महिन्यात व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये 50.42 टक्के तेजी आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिकॉम कंपन्यांनी एजीआरची थकीत रक्कम जमा करण्यास मुदतवाढ मागितली होती. टेलिकॉम कंपन्यांना 4 वर्षांपर्यंत वेळा दिला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती देतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीएसएनल आणि एमटीएनला देखील केंद्र सरकार दिलासा देऊ शकतं. बीएसएनल आणि एमटीएनल वरील कर्ज इक्विटीमध्ये बदलण्यास केंद्र सरकार मंजुरी देऊ शकतं अशी माहिती आहे. आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलंम बिर्ला यांनी जून 2021 रोजी कर्जात बुडालेली व्होडाफोन आयडिया कंपनीतील हिस्सा सरकारकडे सोपवण्याची तयारी दर्शवली आहे.

याशिवाय व्होडाफोन आयडिया कंपनीचा काही हिस्सा वित्तीय संस्थेकडे सोपवण्याची तयारी करण्यात आली होती. ब्रिटनच्या व्होडाफोन कंपनीनं भारतातील बिर्ला ग्रुपसोबत एकत्रित येऊन व्होडफोन आयडिया लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात आली होती

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!