माय महाराष्ट्र न्यूज:मध्य प्रदेशातील छत्तरपूरमधील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री जोरदार चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्रींचे अनेक व्हिडिओ, त्यांच्या मुलाखती सोशल मीडियावर
सातत्याने व्हायरल होत आहेत. धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात देशा-विदेशातील लोक हजेरी लावत आहेत. जीवनातील समस्या, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्यांच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या लोकांची
संख्या वेगानं वाढत आहे.दरम्यान, धीरेंद्र शास्त्रींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात त्यांनी आपण दर्शन घेताना भाविकांना पायास स्पर्श का करून देत नाही
याचं कारण सांगितलं आहे. शास्त्री भाविकांना पायाला स्पर्श का करु देत नाहीत,हे सविस्तर जाणून घेऊ या.आपण भाविकांचा पदस्पर्श का टाळतो, याचं कारण शास्त्रींनी या व्हिडिओत सांगितलं आहे. ते म्हणाले की, “तुम्ही
भाविकांना पाया का पडून देत नाही, असा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारला. या मागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे माझ्याजवळ बालाजीचा दंड असतो. त्यामुळे भाविकांनी मला स्पर्श करणं टाळावं. हा दंड आमची
साधना असते आणि तिचे काही नियम आहेत. या दंडाला दुसऱ्या व्यक्तीने स्पर्श केल्यास आमची साधना भंग होऊ शकते. त्याचा आमच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे माझ्या गुरुचा मला आदेश आणि उपदेश आहे.”
पुढे दुसरं कारण देत ते म्हणाले की, “लोकांना नमस्कार कसा करावा हे नीट माहिती नसतं. लोक येतात आणि माझ्या गुडघ्याला स्पर्श करतात.गुडघ्याला स्पर्श करून आशीर्वाद मिळू शकतो का? याचा अर्थ
मिसकॉल दिल्यासारखा आहे. लोकांना योग्य पद्धतीनं पाया पडता किंवा पदस्पर्श करता येत नाही. त्यामुळे आम्ही लोकांना आमच्या पाया पडा, आम्हाला प्रणाम करा, असं सांगत नाही.