माय महाराष्ट्र न्यूज:मार्च हा उन्हाळ्याचा महिना. मात्र यंदा उन्हाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पुढचे काही दिवस सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पारा४० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे यावर्षी सरासरीहून अधिक कडक उन्हाळा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र उन्हाळा सुरु होण्याच्या आधी राज्यात
पावसाची अंट्री होणार आहे. होळीच्या आधी दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ४ मार्च ते ६ मार्च या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे असणार आहेत. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४ ते ७ मार्च या कालावधीमध्ये विजांच्या
गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहील.नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा
पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी भारतातल्या मान्सूनला अल निनोचा धोका आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला
आहे की, मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात कडक उन्हाळा असणारा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज असून सरासरी तापमान ४० अंशाहून अधिक असण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.