माय महाराष्ट्र न्यूज: महिला वरील गुन्हा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.यामुळे महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशीच एक घटना समोर आली आहे. अहमदनगर शहरातील उपनगरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. राहणार्या एका विवाहीत महिलेला तिचा अश्लिल व्हिडीओ असल्याचे
सांगून ब्लॅकमेल करणार्या मयुर मतकर आणि अक्षय हरीभाउ तागड यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
तिच्या पतीच्या व वडीलांच्या दुकानात काम करणार्या मयुर मतकर व अक्षय तागड यांनीच हा सारा प्रकार घडवुन आणला आहे.घरच्याच दुकानात ते काम करीत असल्यामुळे त्यांच्याशी ओळख होती.
त्याचा गैरफायदा घेवुन आणि मला जिवे मारण्याची धमकी देवुन व्हिडीओ कॉल केला व कपडे काढण्यास सांगितले. याचे रेकार्डींग त्यांनी करुन घेतले. याच रेकॉर्डींगचा वापर करुन माझ्याकडे 4 लाख रुपयांची
मागणी केली. त्यानंतरही अनेक वेळा फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.