नेवासा
लोक काय म्हणतील याचा विचार करु नका.कुणाच नुकसान होत नाही ना,कुणाची हानी होत नाही ना आणि माझे नुकसान होत नाही या तिन गोष्टीची खात्री झाली की स्वतःला हवे ते बिनधास्त करा. स्वत:वर प्रेम करायला शिका असा सल्ला दत्ता कोहीनकर यांनी दिला.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे संत नागेबाबा ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत आयोजित “आनंदी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली” याविषयावर माइंड पॉवर ट्रेनर दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.
नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडू भाऊ काळे, प्राचार्य भारत वाबळे रामकृष्ण नवले सर, डॉ. लहानु मिसाळ,प्रा. सविता नवले यांचे सह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री.कोहिनकर पुढे म्हणाले, जगातील १० टक्के लोकांना रात्री ची झोप येत नाही.४० टक्के लोक मानसिक आजाराकड़े जात आहेत.मानवाचे सारे आयुष्य मनाशी निगडित आहे.बाह्य मन व अंतर्मनाला आपण जे सांगु तेच घडते.म्हणून मनाचे प्रबोधन गरजेचे आहे. मन जैसा सोचता है वही होता है.बाह्य मनापेक्षाही अंतर्मन अधिक कार्यरत असटे, ते १४ तास काम करते.बाह्य मनविचार करते तर अन्तर्मन कृति करते.बाह्य मन हुकुम सोडते आणि बाह्य मन काम करते.
ज्या प्रकारचे विचार मनात कराल, ज्या प्रकारचे चलचित्र मनात पहाल, ज्या प्रकारची वाक्य वारंवार बोलाल, ज्या प्रकारची भावना वारंवार फील कराल, त्या व्यक्तीरेखा आयुष्यात येतात. जसा विचार कराल तशी कृती घडेल. जशी दृष्टि तशी सृष्टी, विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल. सर्व गोष्टी-घटना या आपल्या विचारांशी संबंधित असतात.
कडूभाऊ काळे यांनी आभार मानले.