Wednesday, October 27, 2021

सुरेश वाबळे यांच्या रूपाने राहुरी तालुक्याला मिळाले दुसऱ्यांदा साई संस्थानचे विश्वस्तपद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राहुल कोळसे:गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ लवकरच जाहीर होणार हे निश्चित होतं. त्यावेळी नव्या विश्वस्त मंडळाची यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्यानंतर विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरु लागली होती. शिर्डीतून 50 टक्के विश्वस्त नेमण्याची मागणी होती. मात्र आजच्या यादीत 3 जणांना संधी देण्यात आली आहे.

सुरेश वाबळे यांच्या रूपाने राहुरी तालुक्याला मिळाले दुसऱ्यांदा साई संस्थानचे विश्वस्तपद:

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी दुसऱ्यांदा राहुरी तालुक्यातील गुहा येथील सुरेश वाबळे यांची निवड करण्यात आली आहे. सुरेश वाबळे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे व राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. स्वर्गीय माजी आमदार जयंत ससाणे व माजी आमदार पांडुरंग अभंग

यांच्या कार्यकाळात ही त्यांनी विश्वस्त पद सांभाळले होते‌. सुरेश वाबळे यांनी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदही सांभाळले आहे. त्यांना सहकार व बँकिंग क्षेत्रातील मोठा अनुभव आहे तसेच सामाजिक कामातही ते नेहमी आग्रही असतात.

सध्या वाबळे हे संस्थापक चेअरमन

प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गुहा त्याचबरोबर प्रेरणा मल्टिस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.राहुरी व फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.पुणे जबाबदार सांभाळत आहेत.

[दरम्यान सुरेश वाबळे यांची दुसऱ्यांदा संस्थानच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार प्रसाद तनपुरे व नगरपरीषद मा. नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे यांच्या हस्ते सुरेश वाबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते पंधरा वर्षापूर्वी आपल्या स्वतःचे नावा ऐवजी माझ्या नावाला साहेबांनी अर्थात प्रसाद तनपुरेंनी संमती

दिली व त्यामुळे प्रथमतः संस्थांचे विश्‍वस्त पदी काम करण्याची संधी मिळाली दुसऱ्यांदा मिळालेली संधी राष्ट्रावादी अध्यक्ष शरद पवार व राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे या सर्वांच्या सहकार्यामुळेच मिळाली संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे वाबळे यांनी यावेळी सांगितले .]

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ

आशुतोष काळे- अध्यक्ष

जगदीश सावंत- उपाध्यक्ष

सुरेश वाबळे- सदस्य

अनुराधा आदिक- सदस्य

सुहास आहेर- सदस्य

अविनाश दंडवते- सदस्य

सचिन गुजर- सदस्य

राहुल कनल- सदस्य

जयवंतराव जाधव- सदस्य

महेंद्र शेळके- सदस्य

एकनाथ गोंदकर- सदस्य

शिर्डी नगर पंचायत अध्यक्ष (शिवाजी गोंदकर)- सदस्य

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!