Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकींग! शेतीच्या वादातून एकाची हत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: शेतीच्या जुन्या वादातून 71 वर्षीय वृद्धाचा खून झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे घडली आहे.याबाबद श्रीमती सुनिता उर्फ शालनबाई लक्ष्मण लोणारे (वय 36 वर्ष) धंदा- शेती रा. कारेगाव ता. नेवासा या महिलेने नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी कारेगाव येथे माझे पती लक्ष्मण (वय 71 वर्ष) व 5 वर्षीय मुलीसह राहण्यास आहे.

माझे पती शेती करत असुन त्यातून मिळणा-या उत्पन्नावर आमचा उदरनिर्वाह चालतो. माझे पती लक्ष्मण यांची पहीली पत्नी नामे चंद्रकला बाई ही तीच्या दोन मुलासह रांजणगाव येथे राहते. मोठा मुलगा भाऊसाहेब हे रांजणगाव येथे शेती करतात.माझे पती लक्ष्मण लोणारे यांनी गेल्या पंधरा वर्षापूर्वी जमीन खरेदी केली होती.

त्यामुळे ते काही वर्ष, त्यांची पहीली पत्नी व मुलांसह रांजणगाव येथे राहण्यास होते. तेथुन ते अधुन मधुन कारेगाव येथील वडीलोपार्जीत दोन एकर जमीन करण्यासाठी येत होते. लक्ष्मण यांचे काही वर्ष सुखाने गेल्यावर पत्नि चंद्रकला सोबत घरगुती भांडणे होवु लागले त्यास वैतागुन ते रांजनगाव येथुन पुन्हा कारेगाव येथे राहण्यास आले.

त्यानंतर त्यांनी सन 2015 मध्ये माझ्या बरोबर विवाह केला व मी त्यांचेसोबत कारेगाव येथे राहु लागले.गेले पाच वर्षापुर्वी माझ्या पतीचे पहीली पत्नी व मुले कारेगाव येथे आमच्या घरी आले व त्यांनी मांडण करुन माझे पतीस जबर माराहन केली होती. त्यावेळी माझ्या पतीचा हात फ्राक्चर झाल्याने आम्ही नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.

तसेच आमचे व त्यांची पहीली पत्नी चंद्रकाला यांच्यात कोर्टात वाद सुरु आहे.दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी माझे पती लक्ष्मण लोणारे हे बाजार करण्यासाठी घोडेगाव येथे गेलेले होते. बाजार करुन सांयकाळी परत घरी कारेगाव येथे आल्यावर त्यांनी मला व माझी नंनंद परेगाबाई हीस बोलावुन सांगीतले की, आज वडाळा

येथे चंद्रकाला भेटली होती व तीने मला धमकी दिली की, शेतीचे वाद लवकरात लवकर मिटुन घे नाहीतर या आठवड्यात तुला संपवुन टाकीन अशी धमकी दिली असल्याचे मला व माझी नंनद यांना माझ्या पतीने सांगीतले होते.आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 07:00 वा सुमारस माझे पती लक्ष्मण दादा लोणारे हे झोपीतुन उठुन नेहमीप्रमाणे संडासला शेतात गेले होते.

व बराच वेळ होवुन सुद्धा परत घरी आले नाहीत, म्हणून मी त्यांना सोधण्यासाठी शेताकडे गेल्यावर मला माझ्या सवतीचे मुले भाऊसाहेब लक्ष्णम लोणारे व अशोक लक्ष्मण लोणारे दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासा हे मक्याचे शेतातुन ऊसाकडे पळताना दिसून आले. मी त्या दिशेने मकाचे शेतात जावुन पाहीले असता मला माझे पती.

जखमी अवस्थेत शेतात पडलेले दिसुन आले. मी त्यांना पाहुन आरडा ओरडा केला असता, माझी ननंद परेगाबाई ही शेताकडे पळत आली व तिच्या पठीमागे माझे दिर बाबासाहेब हे तिच्या पाठीमागे आले. मी माझ्या पतीचेजवळ जावुन पाहीले असता त्याचे हातावर धारदार शस्त्राच्या जखमा दिसल्या व डोक्यात कपाळावर धारदार शस्त्राचे वार झाल्याने कपाळ फाटलेले दिसले.

आजुबाजुस मकाच्या पाणावर रक्त लागलेले दिसले व डोक्याचे खाली रक्त जमीनीवर जमा झालेले दिसले. मी त्यांना हात लावून हालवुन पाहीले असता, त्यांनी काहीएक प्रतिसाद दिला नाही त्यानतर कोणीतरी पोलीसांना फोन करुन माहीती दिल्यावर पोलीस तेथे आले.तरी आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 07:00 वा माझे पती लक्ष्मण दादा लोणारे (वय 71 वर्ष) रा. कारेगाव ता. नेवासा

 हे आमचे शेतात संडास करण्यासाठी गेल्यावर माझ्या सवतीचे मुले भाऊसाहेब लक्ष्णम लोणारे व अशोक लक्ष्मण लोणारे दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासा जि. अहमदनगर यांनी जुन्या शेतीच्या वादातुन धारदार हत्याराने माझ्या पतीच्या डोक्यात व हातावर वार करून गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारले आहे. म्हणुन माझी त्यांच्याविरुद्धात कायदेशिर फिर्याद आहे.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा रजी नंबर 707/2021 भादवी कलम 302,34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणी दोन व्यक्तींना चौकशी साठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!