Sunday, October 24, 2021

अजित पवार यांचा खळबळजनक दावा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी आणि भावी सहकाऱ्यांबद्दल केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डॉक्टर डी वाय पाटील ज्ञानशांती शाळेचं उदघाटन पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी खळबळजनक दावा केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत (NCP) येण्यास इच्छूक असल्याचं स्पष्ट अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र इलेक्टिव्ह मेरिटवर प्रवेश दिला जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी भाजपला धक्का बसणार का याची चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड्याच्या विकासासाठी अनेक वर्ष काम केलं. पण 2013-14 मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा होती, त्यामुळे चांगलं काम करुनही राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावं लागलं. पण आता भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी आणि भावी सहकाऱ्यांबद्दल केललं एक विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावरही उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानत काय चाललंय हे कळत नाही, पण सध्या आमचे सरकार व्यवस्थित चालू आहे.

त्यामुळे मी त्या विधानाला विशेष महत्व देत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी काय बोलव, काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!