Wednesday, October 27, 2021

महाराष्ट्रातील धक्कादायक रिपोर्ट:गर्भवती महिलांवर कोरोनाचा होतोय भयंकर परिणाम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : जगासह देशातला कोरोना संसर्ग हे चिंतेचं कारण बनलं आहे. कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएंट सातत्याने आढळून येत असल्यानं लोकांमध्ये संसर्ग वेगात पसरू शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्यावतीने एक संशोधन करण्यात आलं.

यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. प्रेग्नंट महिलांना कोरोना विषाणूमुळे गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचा धोका  असून, अशा स्थितीत त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गर्भवती महिलांना वेळेआधी प्रसूती आणि अत्याधिक तणावाचा  धोका असल्याचं इंडियन

जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. कोरोनासोबतच अॅनिमिया, टीबी आणि मधुमेहासारख्या आजारांमुळे गर्भवती आणि बाळाला नुकताच जन्म दिलेल्या महिलांमध्ये मृत्यूचा धोका वाढू शकतो, असं या संशोधनात म्हटलं आहे.

महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोविड-19चा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांमध्ये कोणते परिणाम दिसून आले, याबाबतचं विश्लेषण या संशोधनात करण्यात आलं आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या 19 वैद्यकीय महाविद्यालयांमधून कोविड-19चा संसर्ग झालेल्या गर्भवती आणि बाळाला जन्म दिलेल्या महिलांविषयी माहिती जमा करण्यात आली.

मार्च 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जमा केलेल्या 4203 गर्भवती महिलांच्या माहितीचं विश्लेषण या संशोधनात करण्यात आलं आहे. यात 3213 जन्म दिलेल्या, 77 गर्भपात झालेल्या, 834 अविवाहित गर्भधारणा झालेल्या महिलांचा समावेश होता. मृत बाळाच्या जन्मासह गर्भावस्था / गर्भपात टक्केवारी 6 टक्के होती.

यात 534 महिलांमध्ये (सुमारे 13 टक्के) कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यापैकी 382 (सुमारे 72 टक्के) महिलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं होती. 111 महिलांमध्ये (सुमारे 21 टक्के) मध्यम, तर 40 महिलांमध्ये (सुमारे 7.5 टक्के) गंभीर स्वरूपाची लक्षणं होती.

यात सर्वांत जास्त आढळून आलेली समस्या म्हणजे वेळेआधी प्रसूती होणं. अशी 528 प्रकरणं सापडली. गर्भधारणेच्या काळात उच्च रक्तदाबग्रस्त महिलांची संख्या 328 होती. 158 गर्भवती, तसंच बाळाला जन्म दिलेल्या महिलांना अधिक देखभालीची गरज होती. त्यातल्या 152 महिलांना कोविड-19 शी संबंधित त्रास जाणवत होता.

या सर्व प्रकरणांमध्ये मृत्यूदर (CFR) 0.8 टक्के दिसून आला. महाराष्ट्रात पुण्यात सीएफआरचा दर सर्वाधिक होता. पुण्यात हा दर 9/1155, मुंबई उपनगरांत 11/1684, मराठवाड्यात 4/351, तर खानदेशात 1/160 असा होता.कोरोना विषाणूमुळे गर्भवती महिलांना संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.

यामुळे मध्यम ते गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग झालेल्या महिलांना तत्काळ उपचारांची गरज आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!