Monday, October 25, 2021

मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : औरंगाबादमधील कार्यक्रमांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले हे अगोदर त्यांना विचारलं पाहिजे,आज भाजपमध्ये नैराश्याचे वातावरण आहे, भाजपामधील अनेक जण ते महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार आहेत ते आल्यानंतर भविष्यामध्ये ते भावी सहकारी होऊ शकतात’ असं सूचक  वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं.

अहमदनगर येथे नूतन शासकीय इमारतीची पाहणीसाठी आले असता त्यावेळी ते बोलत होते. सध्या भाजपमध्ये नैराश्याचं वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्ष राज्यांमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करत आहे, आणि आगामी तीन वर्षेही सरकार पूर्ण करणार आहे, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेले आहे, यासंदर्भात अगोदर त्यांना विचारले पाहिजे, पण दुसरीकडे भाजपात नैराश्य असल्यामुळे आज अनेक जण महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे, ज्यावेळेस ते येतील त्या वेळेला ते भावी सहकारी होतात, असंही थोरात म्हणाले.

‘राज्यामध्ये पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे अजून पंचनामे होणे बाकी आहे, पाथर्डी शेवगाव या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, मात्र यासंदर्भात सर्व विषयांची कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार असून लवकरच त्यबाबतचा निर्णय घेतला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.

‘जीएसटीचा परतावा हा वेळेमध्ये मिळाला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये राज्य चालवताना आम्ही कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढतो, पण दुसरीकडे आमच्या हक्काचं जीएसटीचा परतावा  केंद्र सरकारकडे अडकलेला आहे, तो 30 ते 40 हजार कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे, वास्तविक पाहतात ते पैसे देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ते पैसे वेळेमध्ये देणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने ते पैसे तात्काळ दिले पाहिजे, असंही थोरात म्हणाले.’पेट्रोल व डिझेल हे जीएसटीमध्ये  आणण्यासाठी चर्चा सुरू आहे, त्याचा राज्यावर काय परिणाम होईल, अस विचारल्यावर थोरात म्हणाले की, ‘अगोदर जीएसटीमध्ये आल्यावर किती फायदा आहे व किती तोटा आहे याचा अभ्यास झाल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल’ असेही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.

जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!