Monday, October 25, 2021

नगर जिल्हा ब्रेकींग:शिर्डी विश्वस्त मंडळ बेकायदेशीर, उच्च न्यायालयात आव्हान देणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:- राज्य सरकारने नुकतेच घोषित केलेले शिर्डीचे साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळ हे नियमांना धरून स्थापन करण्यात आले असून विश्वस्त मंडळातील बहुतांश व्यक्तींची निवड ही बेकायदेशीर असल्याने या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याची माहिती सामाजिक तसेच आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी दिली आहे.

संजय काळे यांनी याबाबत सांगितले आहे की, शासनाने एक गॅझेट काढून अकरा विश्वास्थांची निवड घोषित केली आहे. मात्र शासनाने 2004 साली अधिनियम करून विश्वस्त निवडीच्या नियम व अटी तयार केल्या होत्या. पुढे सन 2013 साली त्यात दुरुस्ती करून नवीन नियम व अटी तयार करण्यात आल्या.

त्यानुसार या विश्वास्थांची निवड करताना ज्या तरतुदी, नियम व अटी आहेत त्याचे पालन झालेले नाही.या तरतुदीत विश्वस्त मंडळात एक महिला असणे गरजेचे आहे. तर एक मागासवर्गीय वर्गातील सदस्य असणे गरजेचे आहे. मात्र या विश्वस्त मंडळात एकही मागासवर्गीय सदस्य नाही. आठ सदस्य हे तज्ञ हवेत, मात्र सध्या निवडलेल्या सदस्यात दोन वकील आणि तीन इंजिनिअर आहेत.

पूर्ण आठही सदस्य हे तज्ञ असायलाच हवेत अशी अट आहे. दोन सदस्य हे जनरल कोट्यातून हवेत आणि ते शिर्डी अथवा नगर जिल्ह्यातच हवे असताना जनरल कोट्यातील दोन्ही सदस्य हे नगर जिल्ह्याबाहेरील आहेत.

याबाबत संजय काळे यांनी आक्षेप घेतला असून शासनाने शिर्डी साईबाबा विश्वस्थ मंडळाची केलेली संपूर्ण निवडच बेकायदेशीर असल्याने या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!