Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या कामाची थेट गाडगेबाबांशी तुलना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोना योद्धा आणि साधा माणूस अशी ओळख निर्माण केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या कामाची तुलना आता थेट संत गाडगेबाबा यांच्याशी करण्यात आली आहे. ‘आमदार नीलेश लंके यांच्या रुपाने साक्षात गाडगे महाराजांचे दर्शन झाले,’ असे उद्गार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काढले.

आमदार लंके यांनी पारनेर तालुक्यात आणि इतरत्रही केलेल्या करोना रुग्णांच्या सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्यांच्या कामाचा गौरव करीत लंके यांचं काम दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यासारखे असल्याचे म्हटले होते. आता मिटकरी यांनी त्यांना गाडगे महाराजांची उपमा दिली आहे.

पारनेर मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तो बोलत होते. ते म्हणाले, ‘संत गाडगे महाराजांचे जीवन चरित्र, त्यांचे कार्य पुस्तकात वाचले होते. त्यांची भेट झाली नाही, मात्र पारनेर येथे आल्यानंतर आमदार लंके यांच्या रुपाने साक्षात गाडगे महाराजांचे दर्शन झाले. त्यांच्या माध्यमातून महाराजांच्या विचारांचा वारसा आम्हा सर्वांना मिळाला.

लंके त्यांच्या मतदारसंघात संत गाडगेबाबा यांच्यासारखे काम करत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कामात त्यांचे मोठे योगदान दिसून येत आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो रुग्णांना जीवनदान देणारे आमदार लंके हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीसाठी आदर्श राहिला पाहिजे यासाठी हंगा

गावामध्ये शिवस्मारक उभारून लंके आदर्श काम करत आहेत. हंगा येथे उभारल्या जाणार्‍या शिवस्मारकासाठी मी दहा लाख रुपयांचा निधी जाहीर करतो. लंके यांच्या माध्यमातून राज्याला दुसरे आर. आर. पाटील मिळाले आहेत. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले लंके खरे लोकनेते आहेत,’ असेही मिटकरी म्हणाले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!