Wednesday, October 27, 2021

नूतन साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपाध्यक्ष अनुपस्थित अनेक तर्कवितर्क उधाण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्थानिक ग्रामस्थ, नगरपंचायत तसेच साई संस्थानचे कर्मचारी यांचा विचार करून कायद्याच्या बाहेर न जाता परिसराचा विकास आणि भक्तांभिमुख सुखसुविधा जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केली असून जगप्रसिद्ध साई मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शुक्रवार दि. १७ रोजी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या १२ सदस्यांपैकी अध्यक्षांसह ११ सदस्यांनी शिर्डी शहरात हजेरी लावली. श्री साईंच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीनंतर मंदिर प्रवेश बंदीच्या कारणास्तव साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वार क्रमांक एक लगत आ. आशुतोष काळे यांचे आगमन होताच जंगी स्वागता करून भव्य सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, निलेश कोते, सुधाकर रोहम, नंदकुमार सदाफळ, ज्ञानेश्वर काळे, दिपक गोंदकर, अमित शेळके, पारेश्वर कोते, अजय शेळके, अक्षय काळे, प्रकाश गोंदकर, हर्षवर्धन शेळके, भारत जगताप कोपरगाव कारखान्याचे संचालक, शिर्डीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

यानंतर साई मंदिरातील सभागृहात अध्यक्ष आशुतोष काळे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, विश्वस्त महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, सुहास आहेर, सचिन गुजर, डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, राहुल कनाल, जयंत जाधव आदी अकरा सदस्यांनी पदभार स्विकारत स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, नगरसेवक अशोक गोंदकर, अभय शेळके, सुजित गोंदकर, ग्रिन एन क्लिनचे जितेंद्र शेळके, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, राकेश कोते, काँग्रेसचे सुरेश थोरात, शहराध्यक्ष सचिन चौगुले, सुरेश आरणे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेवर विश्वस्त पदाचा तिढा अखेर २१ महिन्यांनंतर सुटला खरा मात्र सरकारने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्ष सेनेकडे ठेवल्याने कालच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपाध्यक्ष जगदीश सावंत यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक तर्कवितर्क लढविले गेले आहेत.

मागील विश्वस्त मंडळात देखील सेनेचे सर्व सदस्य सतत गैरहजर राहून अपात्र ठरले होते. त्यामुळे आता शिवसेनेची या विश्वस्त मंडळात पुढील भूमिका काय असणार याकडे लक्ष वेधले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!