Friday, October 22, 2021

मुंडे यांची आमदार रोहित पवारांवर जोरदार टीका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज :महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून विकासकामांसाठी काही मदत होणार नाही, हे लक्षात आल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे केंद्रीय मंत्र्यांकडे धाव घेत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केली आहे.

पवारांच्या भेटीवर टीका:
महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी मंत्र्यांची भेट घेतल्याची छायाचित्रे ते प्रसिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांसमवेत छायाचित्र प्रसिद्ध करत आहेत, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

 

केंद्रिय मंत्र्यांच्या भेटी:
आमदार पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार धक्का देण्याचे प्रयत्न केला आहे. काही भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा भाजपमध्ये पूर्वीच अस्वस्थता आहे. आता आमदार पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत मतदारसंघाचे प्रश्न मांडले आहेत.

दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, तसेच नितीन गडकरी, गजेंद्र शेखावत या मंत्र्यांना निवेदन दिले. अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भागवत कराड, वीरेंद्र कुमार, मुक्तार अब्बास यांची देखील भेट घेत त्यांना पवार यांनी निवेदने दिली.

 

केंद्रामध्ये भाजपची सत्ता असून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही पदाधिकारी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!