Monday, October 18, 2021

नगर ब्रेकींग:विहिरीत आढळला तरुणीचा मृतदेह परीसरात एकच खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती येथील गट नंबर ६८२ मधील विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव आहे. ती दि. १४ सप्टेंबरपासून बेपत्ता होती.

वृषाली पंढरीनाथ पवार ही युवती दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ नंतर गवताला जाते म्हणून घराबाहेर पडली परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिची शोधाशोध चालू केली. परंतु ती मिळून आली नाही. दरम्यान ती बेपत्ता झाल्याची ह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली होती.

परंतु १७ सप्टेंबर रोजी सकाळी रमेश सुकदेव पवार हे शेतात जात असताना गट नं ६८२ मधील काठोकाठ भरलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानिकांना तसेच श्रीरामपूर ग्रामीण तालुका पोलिसांना दिली. पोलीस पाटील अभंग हे घटनास्थळी हजर होत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी साखर कामगार हॉस्पिटल येथे नेण्यात आला.

दरम्यान प्रथमदर्शी समजलेल्या माहितीवरुन सदर तरुणीचे लग्न जमत नसल्यामुळे नैराश्यातून हा प्रकार झाल्याचे समजते. वृषालीचे आई-वडील हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. वृषालीही मोलमजुरी करत होती.

तिच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परीवार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात नोंद करून पुढील तपास पो. नि. श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. आडांगळे करत आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!