Wednesday, October 27, 2021

आता एटीएममधून मिळणार औषधं आणि प्रेग्नेंसी कीट;वाचा संपूर्ण माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद असल्या की तरीही आपण एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकतो. त्यातप्रमाणे आता तुम्हाला औषधंही उपलब्ध होणार आहेत. जरी दुकानं बंद असली तरीही आता एटीएमच्या माध्यमातून तुम्हाला औषधं मिळू शकणार आहेत.

देशात आता औषधांचं एटीएम सुरु करण्यात आलं आहे. देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचं हे मशीन बसवण्यात येणार आहे. या माध्यमातून दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. देशातील एकूण 6 हजार ब्लॉक्समध्ये हे मशीन लावण्यात येणार आहे.

कसं काम करेल हे एटीएम?:तुमच्या डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन या मशीनमध्ये टाकावं लागणार आहे. आणि त्यानंतर ही औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये या पद्धतीचा करार झाला आहे.
गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधं त्याचप्रमाणे

इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि विविध प्रकारची औषधं या एटीएममधून नागरिकांना मिळणार आहेत.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, या एटीएम मशिनमधून जेनेरिक औषधं ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. जेणेकरून नागरिकांना जेनेरिक औषध मिळेल. या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्यांकडून

औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. या एटीएममुळे नागरिकांना आता पैशाप्रमाणे औषधंही 24 तास उपलब्ध होऊ शकणार आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!