Monday, October 25, 2021

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.

उद्यापासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी चांगले ऊन पडलेले दिसून येत आहे. उद्या रविवारपासून पुन्हा चांगला ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आकाश स्वच्छ दिसत आहे.

तर पंजाब डख यांच्या महितीनूसार दि.20 सोमवार पासून राज्यात पून्हा पावसाला सुरवात होइल :20,21,22,23,24 या तारखे मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडणार आहे शेतकर्यानी आपल्या काढणीस आलेल्या सोयाबिनची काळजी घ्यावी . जसी उघडीप भेटेल तसे आपले आलेले पिक काढूण घेउण झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी .

हा पाउस पूर्वविदर्भ, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्टात जास्त प्रमाणात पडणार आहे. लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, नगर ,जालना, बीड , परभणी ,हिंगोली, नांदेड ,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा ,अमरावती, अकोला, जळगाव, धुळे ,औरंगाबाद , नंदुरबार ,नाशिक या जिल्हात जास्त पाऊस पडणार आहे. व उर्वरीत जिल्हात तुरळक भागात पाउस असेल माहीत असावे .

सर्वात जास्त पाउस जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्हात पडेल .शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!