Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का:या नेत्याने दिला राजीनामा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा खळबळ उडाली असून भाजपाचे नेते तथा कर्जत पालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे कर्जत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीशी चर्चा झाल्याचे सांगत सहकार्यासह निर्णय घेऊ असे सांगितले. यामुळे आगामी काळात कर्जतच्या राजकारणात भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नामदेव राऊत यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे की, अनेक वर्ष भाजपाच्या विचारधारेप्रमाणे काम करत असतांना भरीव असे काम केले आहे. या काळात अनेक जीवाचे मित्र मिळाले असून खूप काही शिकण्यास मिळाले आहे.

भाजपात काम करत असतांना राम शिंदे, खा. सुजय विखे, शिवाजी कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, स्व. दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी अ‍ॅड. अभय आगरकर आदींचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. राम शिंदे यांच्या कामाबद्दल व त्यांनी सहकार्याबद्दल मी समाधानी असल्याचे सांगत दिलेल्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, असे म्हटले आहे.

नामदेव राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मी भाजपा पक्षात कोणावरही नाराज नाही. राष्ट्रवादीच्या कामाची पद्धत समाधानकार असून राष्ट्रवादीशी आपली चर्चा झाली आहे. यामुळे सहकार्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.

यामुळे नामदेव राऊत हे राष्ट्रवादी पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नामदेव राऊत यांनी भाजपात विविध पदावर काम करत शेवगाव पालिकेसाठी पक्ष निरिक्षक म्हणुन काम केलेले आहे. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!