Monday, October 25, 2021

ब्रेकींग:नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने रुग्णालयात दाखल;उपचार सुरू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. त्यांना ताप आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती भैय्या माने यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्याला त्याचदिवशी मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देताना सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर जिल्हाभर

सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जिल्ह्यातील पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह महाविकास आघाडीनेही सोमय्या यांच्या निषेधाचे पत्रक दिले आहे. हसन मुश्रीफ यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची ही भेट घेतली.

दरम्यान, राज्यभर खळबळ उडवून दिलेले भाजपा नेते किरीट सोमय्या सोमवारी (ता. २०) कोल्हापुरात येणार आहेत.त्यामुळे याठिकाणी ते कोणते आरोप प्रत्यारोप करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताब्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनी लाँडरिंग आणि बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी

करण्यात यावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात दाखल केली आहे

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!