Monday, October 25, 2021

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? जयंत पाटील व देवेंद्र फडणवीसांचा एकच गाडीतून प्रवास

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकीय गोटात कालपासून विविध घडामोडी घडत असून संपूर्ण वातवरण ढवळून निघालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे काल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होताच

आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून आता विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.नंदुरबार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी के अण्णा पाटील

यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकर्पणाचा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. याच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे एकाच कारमधून आले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एकत्र कार प्रवास पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.

काल औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होते. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यात एकाच व्यासपिठावर आहेत. त्या पोठोपाठ आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एकाच व्यासपिठावर दिसलेत.

यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय…? असा प्रश्न निर्माण करणारी ही वस्तूस्थिती आज दिसतेय. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा सर्वच पक्षांचे कार्यकर्ते चक्रावलेत. कार्यकर्त्यांना टेबल टेनीसच्या चेंडू प्रमाणे इकडे तकडे पहावं लागतंय अशी भावना निर्माण करणारं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळतंय.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!