Saturday, October 23, 2021

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कालच्या त्या विधानावर आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे विधान म्हणाले …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर शहरातील हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालया मध्ये कनिष्ठ महाविद्यालयासाठी नव्याने उभारलेल्या इमारतीचे आज (शनिवार) माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व भाजपचे जेष्ठ नेते हेरंभ औटी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमा पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री अब्दुल सत्तार यांनी नगर व नाशिकने पाणी अडविल्याचे सांगितले होते. यावर विचाले असता विखे पाटील म्हणाले, नगर व नाशिकने पाणी अडविले आहे. हे विधान अपुऱ्या माहितीच्या आधारावर आहे. वास्तविक सर्वांना कल्पना आहे.

वरील धरण क्षेत्रात पाऊस झाला तर आपोआप त्याचा परिणाम जायकवाडी भरण्यात होतो. त्यांनी विनाकारण प्रादेशिक वाद निर्माण करणे अयोग्य आहे.बाळासाहेब थोरात यांनी काल भाजपचे काहीजण महाविकास आघाडीत येण्यासाठी उत्सूक असल्याचे म्हटले होते. यावर विखे म्हणाले, त्यांनी त्यांच्याच

नेत्याचे अवमूल्यन केले आहे. सत्तेत ते लाचार म्हणून टिकून राहतात. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची अशी अवस्था आहे की, पक्षाचे हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हीत पाहण्यात मंत्र्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. मुंगेरीलालचे स्वप्न त्यांनी पाहू नये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या विधानावर ते म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते. महाविकास आघाडीची जी विशिष्ट मोट बांधली गेली आहे. ती सत्तेसाठी बांधले गेलेली आहे. भाजप-शिवसेनेने एकत्र 25-30 वर्षे काम केले आहे. त्यामुळे सर्व एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे, असे विखे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!