Wednesday, October 27, 2021

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत;स्टेजवर महिलेचा मास्क स्वत:च खाली घेतला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्य सरकारसोबतच्या संघर्षामुळे चर्चेत असतात. मात्र आता वेगळ्याच कारणासाठी त्यांची चर्चा होत आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली ओढल्याचं समोर आलं आहे.

राज्यपालांच्या या कृतीनंतर मंचावर चांगलाच हास्यकल्लोळ झाला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी पुण्यात होते. यावेळी राज्यपालांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड परिसरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा

या दरम्यान ही सायकल रॅली होणार होती. राज्यपालांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसंच यावेळी राज्यपालांनी एका महिला सायकलपटूचा सत्कारही केला. मात्र हा सत्कार करत असतानाच राज्यपालांनी सदर महिलेच्या तोंडावरून मास्क हटवला.

राज्यपालांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र एकीकडे शासन-प्रशासनाकडून कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात असतानाच राज्यपालांनीच भर कार्यक्रमात एका महिलेच्या चेहऱ्यावरील मास्क हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांना टोला लगावला आहे. ‘राज्यपाल महामहीम आहेत. त्यांनी काही केलं तर त्यावर मी बोलू शकत नाही. राज्यपालांनी शपथ देताना आम्हाला मास्क काढायला सांगितला तर आम्हालाही मास्क काढावाच लागेल,’ अशी तिरकस प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!