Monday, October 25, 2021

आरे वा सोने: १,६२१ रुपयांनी घसरले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सणासुदीत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोने १,१३० रु. स्वस्त होऊन ४५,२०७ रु. प्रति १० ग्रॅमवर आले. गुरुवारीही दिल्लीत सोने ४९१ रु. स्वस्त झाले होते. याच पद्धतीने दोन दिवसांत सोने १,६२१ रु. स्वस्त झाले. किमती घटल्याने दागिन्यांच्या किमती वाढतील, कारण सणात सोने खरेदी शुभ मानली जाते.

Gold Price, सोने १,६२१ रुपयांनी घसरले, ही आहेत घसरणीची ४ मोठी कारणे :वास्तवात सोन्याला डॉलर बळकट होण्याचे परिणाम सोसावे लागत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले, अमेरिकेत रिटेल विक्रीच्या जोरदार आकड्यामुळे डॉलरला सपोर्ट मिळण्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसू शकतो.

५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोने ४५,२५९ रु. व २२ कॅरेट सोने ४१,४५७ रु. प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होते. दागिन्यांचे सोने ४२,५०० पेक्षा खाली केवळ दिल्लीत स्वस्त झाले नाही तर पूर्ण देशाच्या सराफा बाजारात घसरणीचा कल दिसू शकतो. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(आयबीजेए) शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,३१० रु.

तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४२,४२० रु. होती.गेल्या दोन दिवसांत शुद्ध सोन्याची किंमत ९४५ रु. आणि दागिन्यांच्या सोन्याची किंमत ८६६ रु. घटली आहे.

सोन्यातील घसरणीची चार मोठी कारणे :
१ . मोठ्या देशांच्या केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी बंद केली. यामुळे पुरवठा अचानक वाढला आहे.
२. अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर परतल्याने डॉलरला बळ मिळाले आणि सोन्यावर दबाव वाढू लागला.

३. कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता घटल्याने हेजिंगसाठी सोन्याची मागणी कमकुवत झाली.
४. जगभरातील शेअर बाजारांत सलग तेजीचा कल राहिल्याने गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी घटली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!