Wednesday, October 27, 2021

सामान्यांना दिलासा नाहीच! आणखी वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही तेरा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. असे असले तरी बहुतांश ठिकाणी पेट्रोल 110 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे तर डिझेल 98 ते 100 रुपये प्रति लीटरच्या जवळपास आहे. दरम्यान सामान्यांच्या खिशाला यामुळे चाप बसत आहे. या परिस्थितीत सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर वाढल्यास तेल मार्केटिंग कंपन्यांवर (OMC) मार्जिनचा दबाव वाढू सकतो. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार येणाऱ्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तेजी येऊ शकते.

मीडिया अहवालानुसार, सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे सरासरी दर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत प्रति बॅरेल चार ते सहा डॉलर्सनी अधिक आहेत. असे असले तरी अद्याप किरकोळ किंमतीत वाढ झालेली नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या स्तरावरच इंधनाचे दर राहिले

तर तेल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझलचे किरकोळ दर वाढवू शकतात. त्यामुळे सामान्यांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती अनुक्रमे 17 जुलै आणि 15 जुलै रोजी वाढल्या होत्या. IOCL च्या मते, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लीटर आहेत. तर आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे

तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सरासरी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 3 डॉलरपेक्षा जास्त घसरल्या होत्या. अमेरिका आणि चीनकडून मिळालेल्या मिश्र आर्थिक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर आणि वेगाने

पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमुळे आशियातील हालचालींवर निर्बंध आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची घसरण 5 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील ताज्या घडामोडींनुसार, कच्च्या तेलाच्या किमती ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून

सतत वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूड तेलाची वायदे किंमत शुक्रवारी किरकोळ घसरून 75.02 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!