Saturday, October 23, 2021

ब्रेकींग:अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राला देणार घटस्फोट?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर सध्या केस सुरू आहे. डर्टी पिक्चर प्रकरणात त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिल्पा साक्षीदार होणार असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिल्पा राजला घटस्फोट देणार की नाही यावर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.

शिल्पाने एका पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाचा इशारा करते का अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे. शिल्पा शेट्टीच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. लोक या पोस्टला शिल्पा शेट्टीच्या घटस्फोटाच्या निर्णयाचे लक्षण असल्याचं समजत आहेत. शिल्पा शेट्टीने

शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पुस्तकाचे पेज शेअर केलं. या पानावर ‘वाईट निर्णय’ यावर एक दृश्य दर्शवते. एवढेच नाही तर ‘वाईट निर्णया’सह आणखी एक शब्द बोलला गेला आहे, तो म्हणजे ‘ब्रांड न्यू एंडिंग’. चाहत्यांनी याच शेवटच्या शब्दामुळे शिल्पा घटस्फोटाच्या तयारीत तर नाही ना अशी शंका व्यक्त केली.

या पानावर नक्की काय लिहिलंय?

‘घेतलेले वाईट निर्णय, आपण केलेल्या चुका, आपल्याकडून दुखावलेले मित्र यांचे विश्लेषण करण्यात आपण बराच वेळ घालवू शकतो. फक्त हुशार असतो, अधिक धैर्यवान किंवा फक्त चांगले असतो तर. आता कितीही सांगायला गेलं स्पष्टीकरण द्यायला गेलं तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही.’

‘मात्र आपण नव्या मार्गांनी पुढे जाऊ शकतो. अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. जुन्या चुका सुधारू शकता आणि आपल्या लोकांसाठी आपण चांगले बनू शकते. भविष्याला तुमच्या मतांनुसार करू शकता असंही पुढे म्हटलं आहे. शिल्पाच्या या पोस्टमुळे ती घटस्फोटाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा

सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र याबाबत शिल्पाने अधिकृतपणे सध्यातरी कोणताही खुलासा केला नाही. चाहत्यांनी ती घटस्फोट घेऊ शकते असा या पोस्टवरून कयास लावला आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!