Sunday, October 24, 2021

नगर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगरमधील वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता नाशिककरांना भेडसावते आहे. नगरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ते पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत.

कुंटे यांनी नाशिक, नगर, पुणे, ठाणे, सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या अहमदनगरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सध्या रुग्णवाढीमुळे हॉटस्पॉट ठरत आहे.

सिन्नर आणि नगरची सीमारेषा जवळ आहे. यामुळे या भागात रुग्ण वाढत असल्याची शक्यता आहे. ही सारी परिस्थिती लक्षा घेता नाशिक जिल्ह्यामध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिकमध्ये 980 रुग्णांवर उपचार सुरू:
नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या 980 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत देण्यात आली. जिल्ह्यातील 3 लाख 97 हजार 612 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 38, बागलाण 11, चांदवड 37, देवळा 22, दिंडोरी 21, इगतपुरी 08, कळवण 04, मालेगाव 12, नांदगाव 11, निफाड 142, सिन्नर 296, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 10, येवला 62 अशा एकूण 675 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 283,

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 14 तर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्ण असून अशा एकूण 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 7 हजार 107 रुग्ण आढळून आले आहेत.

नियमांचे पालन नाही:
सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांना अक्षरशः हरताळ फासला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. पंचवटी, रामकुंड, शालीमार, अशोकस्तंभ, मुंबई नाका, नाशिकरोड,

अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह सर्वच भागात कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेषतः बहुतांश जण मास्क वापरत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली, तर आटोक्यात आणणे मोठे आव्हान असणार आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...

नगर जिल्ह्यात उद्यापासून खडी क्रशर, खाणपट्टा सोमवारपासून बंद ?

माय महाराष्ट्र न्यूज: खडी क्रशर, खाणपट्टा धारकांवर जाचक अटी राज्य सरकारकडून घातल्या आहेत. त्या मागे घ्याव्यात. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात रॉयल्टी दर कमी करण्याची मागणी...
error: Content is protected !!