Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यात भल्या पहाटे उसात सुरू होता ‘हा’ प्रकार, पोलिस पोहचले अन् …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे उसाच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर भल्या पहाटे धाड टाकत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्याची कामगिरी जामखेड पोलीसांनी केली आहे. याप्रकरणी १५ जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दादा लक्ष्मण इपार (रा वंजारवाडी), बाळासाहेब हरी भाऊ साठे (रा जवळके), घनश्याम कैलास डोके (रा खर्डा), हनुमंत उत्तम देवकर ( रा रत्नापूर, तालुका परांडा), अजय बबन साठे (रा रत्नपुर, तालुका परंडा), राजेंद्र उद्धव डहाळे (रा तरडगाव), रामा जानू आव्हाड महादेव लक्ष्मण शेतकर, संभाजी सिताराम कराड, संदीप भीमा भोसले

(सर्व रा वंजारवाडी), हर्षद नजमो शेख, महेश शहाजी काळे (रा धनेगाव) किरण मुकुंद गोलेकर (रा खर्डा) १४) प्रकाश रामकृष्ण गोलेकर, योगेश अण्णा सुरवसे (रा खर्डा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील एका उसाच्या शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची बातमी जामखेड पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शोध पथकाने आज पहाटे छापेमारी केली. याठिकाणी उसाच्या शेतात झोपडी बांधून जुगार अड्डा चालवला जात असल्याचे समोर आले.

या छाप्यात ५ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पकडलेल्या १५ जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ अ प्रमाणे जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!