Wednesday, October 27, 2021

सत्यजित तांबे यांनी जरा तरी भान ठेवायला हवे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बेरोजगार दिन साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेस करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहीर केले आहे. मग सत्यजित यांचे मामा व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला

तर चालेल का, असा सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक वाढदिवस आनंदाचा दिवस असतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टिका करायला, आंदोलन करायला हरकत नाही.

पंतप्रधान झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर पातळी सोडून टिका करतच आहेत. पण सत्यजित तांबे यांनी जरा तरी भान ठेवायला हवे.असे कुणीही उठून एका आदर्श व्यक्तीच्या वाढदिवसाला असा आचरटपणा करायला लागले तर यानंतर कुणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त गोहत्या दिन

साजरा करू शकतात. कारण संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे रात्रंदिवस हजारो गायींची हत्या होत आहे. गोहत्येला कायद्याने बंदी असताना कॅबिनेट मंत्र्यांच्या गावात सर्रासपणे गायींची कत्तल होत आहे. म्हणून तुमच्या नेत्यांचा वाढदिवस गोहत्या दिन

म्हणून साजरा केला तर तुम्हाला चालेल का, असा सवाल नगराध्यक्ष वहाडणे यांनी सत्यजित तांबे यांना केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!