Sunday, October 24, 2021

रोहित पवार म्हणाले म्हणून पेट्रोल, डिझेल GST च्या कक्षेत आणणं धोक्याचं’

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पेट्रोल-डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणण्यास विरोध करणारी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयामुळे राज्यापुढे निर्माण होणारे संभाव्य धोके कोणते आहेत, यावर प्रकाश टाकला आहे.

इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्यापेक्षा केंद्र सरकारनेच आपले कर कमी करणे हा चांगला उपाय असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.या विषयावर रोहित पवार यांनी वेळोवेळी आपली मते मांडली आहेत. जीएसटीच्या कक्षेत आणण्यापेक्षा कर कमी करणे हा उपाय त्यांनी पूर्वीही सुचविला होता.

आज जीसीएसटी परिषदेची बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे, त्यांनी म्हटले आहे, पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आणल्यास पेट्रोलच्या किंमती नक्कीच कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळू शकतो, परंतु यामुळे केंद्र सरकार आणि राज्यांनाही मोठा महसुली फटका बसू शकतो.

राज्यांच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्राला सर्वाधिक आठ ते दहा हजार कोटींचा फटका बसला आहे, तर केंद्रालाही दोन लाख कोटींचा फटका बसू शकतो. हे नुकसान भरून काढायला केंद्र सरकार एका झटक्यात कुठलीही सरकारी कंपनी विकेल, मात्र महाराष्ट्राला असं करता येणार नाही.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी जनसामान्यांना मोठा फटका बसत आहे, त्यामुळं सामान्य जनतेला नक्कीच दिलासा द्यायला हवा. परंतु त्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती इतक्या का वाढल्या आहेत? याचाही विचार करणं गरजेचं आहे. केंद्राचा डिझेलवर प्रति लिटर ३२ रुपये तर राज्याचा १९ रुपये कर आहे, पेट्रोलवर केंद्राचा ३३ रुपये तर राज्याचा ३० रुपये कर आहे.

केंद्र सरकारचे कर हे लिटरप्रमाणे आकारले जातात. म्हणजेच हे कर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होवो अथवा जास्त होवो केंद्र सरकारचे कर नेहमीच ३३ रुपये असतात. राज्य सरकार आकारत असलेल्या करांपैकी बहुतांश भाग किमतीच्या २४ टक्के किंवा २६ टक्के याप्रमाणे असतो.

त्यामुळे राज्याचा कर आता सध्याच्या घडीला जास्त दिसत असला तरी कच्च्या तेलाच्या किमती कमी होताच राज्याचे कर कमी होतात. असे रोहित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!