Monday, October 25, 2021

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा तुमच्या शहरातील एक लीटर पेट्रोलचा भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वस्तू आणि सेवा कर अर्थात GST काउंसिलची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमणत यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं,

की ‘पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली नाही.दरम्यान आज रविवारी IOCL ने पेट्रोल-डिझेलचे नवे जर जारी केले आहेत. सलग 14व्या दिवशी किमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत.

पेट्रोल-डिझेल दरात 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी 15 पैशांची कपात केली होती. त्यानंतर इंधन दर स्थिर आहेत.देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात.

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात.

आजचे पेट्रोल-डिझेल भाव:
> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर
> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर
> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!