Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील हा कारखाना ईडीच्या रडारवर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री प्रक्रीयेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी कारखाना बचाव समितीने केंद्रीय अर्थमंत्री तसेच सक्तवसुली संचालनालया (ईडी) कडे केली आहे

बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेतली. माणिकराव जाधव व किरीट सोमय्या यांचीही बचाव समितीने भेट घेतली आहे. पारनेर कारखाना विक्रीनंतर लगेचच यातील गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली होती.

पुढे याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ऑगस्ट 2019 मध्ये उच्च न्यायालयाने ईडीला कारवाईचे आदेश दिले होते. परंतु ईडीच्या मुंबई झोन कार्यालयाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई केली जात नसल्यामुळे

कारखाना बचाव समितीने ईडीच्या मुंबई झोन अधिकार्‍यांची तक्रार दिल्लीतील मुख्य संचालक व अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे.कारखाना विकत घेणारी खाजगी कंपनी क्रांती शुगर यांच्याकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे 32 कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला होता. राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती.

तर कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले 23 कोटी रुपये उद्योजक अतुल चोरडीया व अशोक चोरडीया यांच्याकडून उसने घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. तर उर्वरीत नऊ कोटी रुपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्या कडून घेण्यात आलेले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात ही बाब आता उघड झाली आहे. कारखाना घेण्यासाठी वापरलेला पैसा काळा असावा असा संशय आहे. हा व्यवहार पुर्ण करण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने पैसा पुरवला असल्याची माहीती ईडीला देण्यात आली आहे. आता त्याबाबत ईडी चौकशी करणार आहे.

या विक्री गैरव्यवहारात राज्य सहकारी बँक क्रांती शुगर, दुय्यम निबंधक पारनेर, अवसायक पारनेर हेही जबाबदार असल्याचे पुरावे ईडीकडे देण्यात असल्याचे बचाव समितीचे साहेबराव मोरे, रामदास सालके यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!