Friday, October 22, 2021

अंकुर अ‍ॅग्रो मॉल चे कडूस पाटील यांच्या हस्ते चिलवडी कर्जत येथे उद्घाटन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : चिलवडी कर्जत अहमदनगर येथे विल अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या अंकुर अ‍ॅग्रो मॉल चे उद्घाटन राज्य कृषि पदवीधर संघटना चे जनरल सेक्रेटरी व उद्योगभारती चे संचालक महेश कडूस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विल अ‍ॅग्रो चे संस्थापक संचालक संदीप शिंदे व या कंपनी च्या शेतकरी सभासदांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

शेतकऱ्यांच्या पीक भाजीपाला उत्पादनाला कृषि निविष्ठा आवश्यक असतात. या खते औषधे यांची बाजारात किंमत जास्त असते. सभासद शेतकऱ्यांना ही सेवा औषधे खते, विद्राव्य खते, किडनाशके कमी किंमतीत मिळाली पाहिजे म्हणून तालुक्यातील नाही तर जिल्हा पातळीवर देखील अशा प्रकारचा हा पहिलाच मॉल आहे .

असे कंपनी सभासद यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला कडूस पाटील यांनी राज्य कृषि पदवीधर संघटना च्या वतीने शुभेच्छा देताना सांगितले कि सुशिक्षित पदवीधरांनी शेती क्षेत्रात फार्मर प्रोड्युसर कंपनी सारखे प्रयोग केले तरच शेतकरी व्यवसायिक होणार आहेत. या वेळी कडूस पाटील यांनी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला कृषि पदवीधर उद्योजक व कृषि पदवीधर संघटना चे आजीवन सदस्य सुदर्शन कोपनर, उद्योजक श्री म्हेत्रे, कृषि उद्योजक अजितसिंह जी फाळके, माजी सभापती मा. शामभाऊ कानगुडे, हभप मा. खराडे गुरुजी, व अनेक चिलवडी ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी कृषि पदवीधर संघटना

या संस्थेचे सचिव श्री प्रकाश यादव यांनी ईस्त्राईल कृषि अभ्यास दौरा व संघटनेचे कृषि आणि उद्योग व्यवसाय याला वाहिलेले किसानभारती मासिकाचा चौथा अंक शेतकरी यांना स्वहस्ते वाटप केले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!