Friday, October 22, 2021

महेश कडूस पाटील यांनी घेतली आमदार राहुल कुल यांची भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कृषि पदवीधर संघटना चे राज्यातील चर्चेतील नेते महेश कडूस पाटील यांनी आज दौंड येथे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली. राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असताना महेश कडूस पाटील हे त्या पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष होते.

आमदार राहुल कुल हे सध्या भाजप नेते असून महेश कडूस पाटील हे कृषि पदवीधर संघटना चे प्रमुख नेते व त्यांचे सर्व संबंधित नेते हे भाजपचे प्रमुख नेते असल्याने या भेटी नंतर तरुण कार्यकर्ते यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महेश कडूस पाटील हे राज्यातील लोकप्रिय नेतृत्व असून सध्या त्यांच्या वडीलांच्या निधनानंतर ते स्थानिक पातळीवर सक्रिय झाले आहेत.

या भेटीत सुमारे एक तास चर्चा झाली असून पारनेर तालुक्यातील विविध प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोचवण्या साठी मी माझे स्नेही आमदार राहुल दादा कुल यांची भेट घेतली असल्याचे कडूस पाटील यांनी सांगितले आहे. राहुल दादा हे मला मोठ्या भावा प्रमाणे असून ते एक आरोग्य दूत आहेत.

कृषि पदवीधर संघटना चे प्रमुख नेते भाऊसाहेब कडूस पाटील यांच्या जयंतीनिमित्त माझ्या मतदारसंघात जनतेची आरोग्य सेवा कशी करता येईल यावर मी त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे असे देखील कडूस पाटील यांनी सांगितले आहे. या भेटी नंतर दक्षिण नगर भाजप मधे कडूस पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

भविष्यात कडूस पाटील भाजप समवेत राहण्याची शक्यता आहे. नुकत्याच पारनेर तालुक्यातील स्थानिक आमदार यांनी राहुल कुल यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्या नंतर महेश कडूस पाटील यांनी ही भेट घेतली आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!