Saturday, September 23, 2023

पुढचे २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, ८ जिल्ह्यांमध्ये ….

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात वारंवार हवामानात बदल होताना पाहायला मिळतात. अशात महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.हवामान खात्याने

दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असल्याची

माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पालघर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर छत्रपती संभाजीनगर, पूर्व विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्येदेखील ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह

ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती विल्हेवाट लावावी, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान,

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होणार आहे. सध्या कोकण वगळता इतर महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत गडकराटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. ७ मार्चला अनेक जिल्ह्यांमध्ये

गारपीटीची शक्यता आहे. मात्र, मुंबईमध्ये याचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही पण अंशत: ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ०७ मार्चपासून संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी

हलक्या पावसाची गडगडाटासह शक्यता आहे. ०८ मार्चपासून अमरावती, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!