Monday, October 25, 2021

खूशखबर: या तारखेपासून १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: १२ ते १७ वयोगटातील मुलांचे १ ऑक्टोंबरपासून लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात व्याधीग्रस्त मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.आत्तापर्यंत देशातील ८० कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.देशात १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे ४४ कोटी आहे.

त्यातील १२ ते १७ या वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.इन्सॅकॉग आणि कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष प्रा. एन. के अरोरा यांनी सांगितले की,या वयोगटातील मुलांद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली जाईल.लहान मुलांमध्ये कोरोनाचा फारसा संसर्ग झाला नसल्याचे आतापर्यंतच्या सिरो सर्व्हेमधून आढळून आले आहे.

मात्र प्रौंढातील मोठ्या वर्गाचे लसीकरण झाले असल्याने १२ ते १७ या वयांच्या मुलांना आधी लस देण्याचा मानस आहे.पहिल्या टप्प्यात व्याधीग्रस्त मुलांना आधी लस देण्यात येईल, असे प्रा. अरोरा म्हणाले.एरवीही लहान मुलांमध्ये मोठे आजार व त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमीच असते.त्यामुळे त्यांच्याऐवजी पालकांच्या सुरक्षिततेकडे आधी लक्ष देण्यात आले. सध्या प्रौढांचे लसीकरण वेगाने सुरू आहे.

त्यामुळे मुलांचे लसीकरण करण्याबाबत सरकार विचार करत आहे.ही’ लस देणार:देशात १२ ते १७ या वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले असून, त्यातील जेमतेम १ टक्का मुले व्याधीग्रस्त आहेत. ही संख्या सुमारे ४० लाख असावी, असा सरकारचा अंदाज आहे. त्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोफत लस देण्यास सुरुवात होईल. औषध महानियंत्रकांनी

 झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ही लस भारतातील मुलांना दिली जाईल.लसीकरणाला वेग:पहिल्या टप्प्यात देशभरात लसीच्या पुरवठ्यावरून मोठा गोंधळ उडला होता. माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर लसीच्या वाटपात पक्षपात केल्याचा आरोप केला होता. त्याचे चटके थेट केंद्र सरकारला बसले.

त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात हर्षवर्धन यांच्या जागी मनसुख मांडविया यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाचा कार्यभार दिला. मांडविया यांनी सूत्रे घेतल्यानंतर लसीकरणाला वेग आला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!