Monday, October 25, 2021

नगर जिल्हा ब्रेकींग:डोक्यात दगड घालून वेटरचा खून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :दोन दिवस पुर्वी शेतीच्या वादातून एकाहत्तर वर्षीय शेतकऱ्याची त्याच्याच मुलांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. नेवासे तालुक्यातील कारेगाव येथे शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मृताच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

लक्ष्मण दादा लोणारे (वय ७१, रा. कारेगाव, ता. नेवासे) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मृताची दुसरी पत्नी सुनीता ऊर्फ शालनबाई लोणारे यांनी नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरील घटना ताजी असताना अजून एक खूनाची घटना समोर आली आहे. डोक्यात दगड घालून एका परप्रांतीय वेटरचा खून केल्याची घटना राहुरी शहराजवळील एका हॉटेलमध्ये घडली आहे. सोनू थापा असे त्या मयत झालेल्या वेटरचे नाव आहे. शनिवारी रात्री मध्यरात्री नंतर २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान मयत वेटरबरोबर असलेला एक नामदेव नामक वेटर पसार झाला असून तो शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी आहे. हे दोघेही हॉटेलमध्येच मुक्कामाला रहायचे. खुनाचे कारण अद्याप समजले नाही.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप मिटके व राहुरीचे पोलीस आज सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली आहे. नगर- मनमाड हायवेवर हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये हा थरार झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!