Monday, October 25, 2021

खा: प्रीतम मुंडे म्हणाल्या;मोदींचा तो गुण अधिक आवडतो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र, मोंदीच्या या कृतीवर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं वेगळच म्हणणं आहे. मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुणच आपल्याला आवडत असल्याचं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.

मुंडे यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी हे विधान केलं आहे. मोदींचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली.

पण ते आपलं काम करत आहेत. आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत, असं मुंडे म्हणाल्या.मोदींबद्दल चांगलं बोलणारे दहा लोकं असतील तर टीका करणारे चारदोन लोक असतातच. पण त्या टीकेने मोदी विचलीत होत नाहीत. ते आपलं काम करत राहतात, असंही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी बीड राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. बीड जिल्ह्याला भ्रष्टाचारी राष्ट्रवादीपासून मुक्त करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी झटून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. सध्या कंत्राटदारांना हाताशी धरून आपणच काम केल्याचा आव आणला जात आहे. तशा बातम्याही पेरल्या जात आहेत.

ज्या रस्त्याशी ज्यांचा संबंध नाही, त्या रस्त्याच्या कामाचं श्रेयही हे लोक घेत आहेत, असा चिमटाही त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना काढला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!