Monday, October 18, 2021

अजित पवारांचा खरा चेहरा उघडा झाला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे  नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या अंतर्गत  आणण्याची चर्चा सुरू झाली जेणेकरुन हे दर 30-35 रुपयांनी कमी होतील. याच मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलयांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांचा खरा चेहरा उउघडा पडला असल्याचं म्हटलं आहे.

पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आता चेहरा उघडा झाला… आम्ही वारंवर असं म्हणत होतो की, राज्यांनी त्यांचा टॅक्स केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होणार आहेत. जे गोव्यात आणि गुजरातमध्ये आहेत. आता अजित पवारांचा चेहरा उघड झाला की, त्यांना पेट्रोल-डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा त्याच्यावर राज्य चालवायचं आहे.

त्यामुळे त्यांनी पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्यास विरोध केला. पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणल्यास थेट 30-30 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील.आता सर्वसामान्य नागरिकांनी अजित पवारांना प्रश्न विचारावा की, तुम्ही का नाही गेले लखनऊ ला? तुम्ही का विरोध करताय पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यास… म्हणजे तुम्हाला महागाईचं काहीही पडलेलं नाहीये.

तुम्हाला आयता पैसा पाहिजे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मला हे कळत नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुणे, पिंपरी चिंचवडचे आहेत. पुर्ण कोविड काळात ते नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यात गेले? का हे जिल्हे कुठे आहेत हे त्यांना महितीच नाहीत. परवा त्यांनी घोषित केलं,

स्वत: किती लहान केलं की पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निवडणुका माझ्या नेतृत्वात होणार. प्रत्येकाचं आपलं प्लॅनिंग असतं, उगाच त्याचं ढोल वाजवण्याचं कारण नाही. दोन दिवसांनी आम्ही काय करतो पहा. तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये काय करु शकता हे ढोल वाजवत सांगितलं

आम्हाला शांत राहून काम करण्याची सवय आहे. तुम्ही कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा शेवटी लोकांचं नरेंद्र मोदींवर प्रेम आहे. लोकांचं नगरसेवकांवर प्रेम नाहीये. जाणाऱ्याने विचार करावा पुन्हा येण्याची वाट बंद आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!