Monday, October 25, 2021

ई-पीक नोंदणीची शेतकऱ्यांवर सक्ती नको:कृषी पदवीधर संघटनेच्या पूर्वा जाधव व मयुरी सातव यांची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु केलं आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात 15 ऑगस्टला झाली होती.

परंतु राज्यातील शेतकऱ्यांमध्ये ई- पीक नोंदणीसंदर्भात संभ्रमावस्था आहे. बहुतांश शेतकरी हे अशिक्षित, अल्पशिक्षित तसेच निम्न गरीब वर्गातील असल्याने शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी अॅपवर ऑनलाईन पीकपेरा नोंदणी करणे शक्य नाही. अशावेळी शेतकरी कोणत्याही शासकीय लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी ई-पीक नोंदणीसाठी

शेतकऱ्यांना सक्ती न करता सदरचा संपूर्ण कार्यक्रम शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा, असे विनंती वजा निवेदन महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पूर्वा जाधव व बारामती तालुका उपाध्यक्ष मयुरी सातव या पदाधिकाऱ्यांनी  तलाठी अधिकारी यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये सद्यःस्थितीत शेतातील खरीप पीकपेरा नोंदणीसाठी ‘

ई-पीक नोंदणी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेती सर्व्हे व गट क्रमांक तसेच एकूण क्षेत्र, पोटखराब क्षेत्रनिहाय पिकांची माहिती शेतकऱ्यांना स्वतः अँड्रॉइड मोबाईलद्वारे भरणे बंधनकारक केले आहे. परंतु राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आणि अनवाणी पायाने

शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांकडून अँड्रॉइड मोबाईलद्वारे पीकपाणी माहिती संकलित करणे म्हणजे त्यांच्या या परिस्थितीची एकप्रकारे थट्टाच आहे.ग्रामीण भागात नेटवर्क समस्या भरपूर आहेत तसेच राज्यातील प्रत्येक गावात खेडोपाडी अजूनही इंटरनेट सेवांशी संबंधित अडचणी आहेत आपला शेतकरी बांधव हा गरीब आणि अर्धशिक्षित किया अशिक्षित आहे.

त्यामुळे ई पीक पाहणी वर शेतकऱ्याला सर्व नोंद ठेवणे हे शक्य ही नाही. आपणास कृषि पदवीधर संघटनेच्या वतीने विनंती करतो की शेतकरी कोणत्याही शासकीय लाभापासून वंचित राहू नये यासाठी अशा प्रकारची सक्ती काढून पूर्वीप्रमाणे शासकीय यंत्रणेला हे काम सोपवावे असे या निवेदनात म्हटले आहे. संबंधित निवेदन बारामती तालुका तहसीलदारांनाही देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!