Monday, October 25, 2021

बाबुल सुप्रियो यांचे भाजपावर गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे

अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपा नेते स्वपन दासगुप्ता यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक पहायला मिळाली.

बाबुल सुप्रियोच्या पक्षांतरामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते, असा दावा स्वपन दासगुप्तानी केला होता. या दाव्याला उत्तर देताना सुप्रियो म्हणाले, की भाजपामध्ये सामील झाल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला ज्यांना महत्वाची पदं देण्यात आली होती, त्या प्रतिस्पर्ध्यांबाबतही हेच खरं असावं. तसेच मी पक्ष बदलून इतिहास रचला आहे का?

असं असेल तर भाजपमध्ये सुद्धा दुसऱ्या पक्षातून नव्यानं सामील झालेल्या ‘एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यां’च्या गळ्या भेटी घेतल्या गेल्या आहेत आणि त्यांना उच्च पदांवर बसवले गेले आहे. हे सर्व करताना जे भाजपचे तळागाळातील खरेखुरे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. जर तुमचं म्हणणं आहे मी पक्ष बदलून माझी स्वत:ची प्रतिमा खराब करून घेतली आहे

तर मग भाजपमध्ये आलेल्या लोकांची देखील प्रतिमा खराबच झाली असेल नाही का?’ असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, बाबुल सुप्रियो यांना टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर भाजप समर्थकांचा राग येणं आणि सामान्य लोकांचा तिरस्का वाटणं खूपच स्वाभाविक आहे. याला उत्तर देताना

बाबुल सुप्रियो म्हणाले, “हे मला मान्य असून माझा राग खरा आहे. तसेच याच बाबुलने बाहेरच्यांना भाजपमध्ये घेण्याचा जाहीरपणे निषेध केला होता त्याचे काय? त्यावेळी काय भाजपने बाबुलची प्रतिमा चांगली केली होती का? याच समर्थकांना विचारा ज्यांना या बाहेरून आलेल्या लोकांनी बाजूला केले होते,” असंही बाबुल सुप्रिया म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!